Thursday, April 17, 2025
Latest:
अहमदनगरजुन्नरपुणे जिल्हाविशेष

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींकडुन तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या २० मोटारसायकल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाबुलेटीन न्युज : आनंद कांबळे
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करून पर्दाफाश केला आहे. तीन आरोपींकडुन तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या असंख्य घटना वाढल्या होत्या, त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार नारायणगाव पोस्टे गु.र.नं १०७/२०२१ भादवि कलम ३७९ चा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे किरण पिंपळे याचा शोध घेत असताना आज दिनांक 9/7/2021 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्या सोबत चोरीच्या मोटारसायकली घेण्यासाठी आदित्य निकम नावाच्या इसमाकडे रांजनी, ता.आंबेगाव, जि. पुणे गावचे हद्दीत कारफाटा येथे येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या बातमी प्रमाणे रांजनी कारफाटा या ठिकाणी सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबरच्या मोटरसायकली सह संशयितरित्या फिरताना आढळून आला. थोड्याच वेळात २ इसम मोटरसायकलींवर त्या ठिकाणी आले त्यांना थांबवून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे १) किरण भास्कर पिंपळे वय २५, रा. दरडगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर २) प्रवीण नामदेव बाचकर, वय २८ रा. कानगर, ता. राहुरी, जि. अहमदनगर ३) आदित्य दत्तू निकम, वय १९ रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्यातील इसम नामे आदित्य निकम याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा साथीदार नामे रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह मिळून पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकानांवरून मोटारसायकली चोरी केल्या असून चोरलेल्या गाड्या आम्ही किरण पिंपळे, प्रवीण बाचकर कैलास येळे यांच्याकडे विक्रिस देत होतो.

चोरलेल्या मोटारसायकली पैकी काही मोटारसायकली आदित्य निकम याच्या घराजवळ लावल्या असून काही मोटारसायकली किरण पिंपळे, प्रवीण बाचकर, कैलास येळे यांच्याकडे आहेत अशी माहिती दिली. सदर माहिती वरून वरील ठिकानी जाऊन एकूण ८,७०,००० रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण २० मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. सदर आरोपी खालील पोलीस स्टेशन मध्ये सदर मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.                                                                                १) खेड पोस्टे गु.र.नं ३३२/२०२१ भादवि कलम ३७९

२) खेड पोस्टे गु.र.नं. ३६२/२०२ भादवि कलम ३७९
३) पारनेर पोस्टे गु.र.नं. १६७/२०२१ भादवि कलम ३७९
४) शिरूर पोस्टे गु.र.नं. ४७२/२०२० भादवि कलम ३७९
५) शिरूर पोस्टे गु.र.नं. १४५/२०२१ भादवि कलम ३७९
६) ओतूर पोस्टे गु.र.नं. ६५/२०२१ भादवि कलम ३७९
७) यवत पोस्टे गु.र.नं ८६८/२०२० भादवि कलम ३७९
८) आळेफाटा पोस्टे गु.र.नं २२३/२०२१ भादवि कलम ३७९
९) शिरूर पोस्टे गु.र.नं ५२९/२०२१ भादवि कलम ३७९
१०) शिरूर पोस्टे गु.र.नं ४०८/२०२१ भादवि कलम ३७९

तसेच आरोपी क्रमांक १ हा यापूर्वी खालील पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात फरार आहे.
१) नारायणगाव पो.स्टे गु र नं. १०७/२०२१ भादवी कलम ३७९
२) नारायणगाव पो. स्टे गु र नं. १२१/२०२१ भादवी कलम ३७९

सदर आरोपींकडून ८ लाख ७० हजार रकमेच्या एकूण २० मोटारसायकल जप्त केल्या असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोस्टेच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री मंदार जवळे, यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस नि.श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नेताजी गंधारे,
सपोनि पृथ्वीराज ताटे, पोहवा हनुमंत पासलकर, पोहवा विक्रम तापकीर, पोहवा दिपक साबळे, पोना संदीप वारे, पो. अक्षय नवले, पो. निलेश सुपेकर, पो ह मुकुंद कदम, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, पो. दगडू वीरकर तसेच नारायणगाव पोस्टेचे पो ना दिनेश साबळे, सचिन कोबल यांनी केली आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!