पुणे जिल्ह्यातील आणखी एक पत्रकार कोरोनाने हिरावला…
लोणी काळभोरचे पत्रकार राजकुमार काळभोर यांचे कोरोनामुळे निधन
महाबुलेटीन न्यूज
पुणे : अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचा निष्ठावंत पाईक, पुणे जिल्हा पञकार संघाचा बुलंद आवाज, हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संस्थापक, कार्यकुशल, बहुआयामी व्यक्तीमत्व, पत्रकार राजकुमार काळभोर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
● गेले कित्येक दिवस ते कोरोना विरुद्ध विश्वराज हौस्पिटल लोणी काळभोर (स्टेशन) झुंज देत होते. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने उपचार करणेबाबत असंख्य अडचणी येत होत्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब काळभोर व सल्लागार तुळशीराम घुसाळकर यांनी वारंवार त्यांचे तब्यतेची येथील वैद्यकीय अधिकारी यांचेशी चर्चा केली होती. मात्र नियतीने शेवटी डाव साधला. आपले राजकुमार काळभोर आज सर्वांना सोडून गेले यावर विश्वास बसत नाही…..राजकुमार बाप्पूंच्या दुःखद निधनाने पुणे जिल्हा पञकार संघाला जबरदस्त हादरा बसला आहे…..त्यांच्यासारखा सकारात्मक समाजसेवी माणूस हरपला, हे समाजाचे फार मोठे नुकसान आहे…काळभोर परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत….पुणे जिल्हा पञकार संघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली…
— सुनील लोणकर ( अध्यक्ष – पुणे जिल्हा पत्रकार संघ )
—–