पुढील काळात पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख
चाकण एमआयडीसीतील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट ऑक्टोबर अखेर सुरु होणार
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मंचर, दिनांक १३ ऑक्टोबर : पुणे,पिंपरी चिंचवड,व पुण्याच्या ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्न दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णालयांकडुन ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मात्र चाकण येथील एअर लिक्विड हा फ्रान्सच्या कंपनीचा प्लांट ऑक्टोबर अखेर सुरु होणार असुन 118 मैट्रिक टन क्षमतेची या प्लांटची उत्पादन क्षमता असणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कोरोना आढावा बैठकीत ते उपस्थित होते, तेव्हा बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील कोरोना नियोजन बैठकी नंतर माध्यमासोबत बोलताना ही माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यासोबत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम 40 लाख लोकांपर्यंत पोहोचल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. कोरोना रुग्ण कमी होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खाजगी हॉस्पिटलमध्ये मागील माहिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता तो आता नाही. बेड व व्हेंटिलिटर आता रिकामे आहेत. त्यामुळे डेथ रेशो कमी होईल, असा आशावाद डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात 126 व्हेंटिलेटर दिले असून सर्व रुग्णांची काळजी घेतली जात आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबत ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना येणारी अधिकची बिले कमी करण्यात ऑडिटर नेमले असून जवळपास 700 पेक्षा जास्त रुग्णांना बिले कमी केली आणि 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा रुग्णांना मागे देण्यात आली आहे. मनरेगा बाबतही पुढील आठवड्यात बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.