प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी घेतली खराबवाडीत कोरोना आढावा बैठक, ग्रामस्तरीय समितीचे केले कौतुक
खाजगी हॉस्पिटल मध्ये ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे दिले आदेश
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे खेडचे प्रभारी प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी आज ( दि. ३१ जुलै ) ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन वाढत्या कोरोणा संसर्ग नियंत्रणा बाबत चर्चा व मार्गदर्शन केले. तसेच आज अखेर पर्यंत ग्रामस्तरीय समितीने कोरोना संसर्ग बाबत लॉक डाऊन काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
ग्रामस्तरीय समितीने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करून आगामी काळात कोरोना संसर्ग बाबत अधिक जबाबदारी वाढणार असून त्यासाठी पूर्व तयारी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खाजगी हॉस्पिटल मधील ८०% खाटा राखीव ठेवणे व जे कारखाने नियमाचे उल्लंघन व कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करत नाहीत, अश्यांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी विशेष चर्चा करण्यात आली.
यावेळी मंडल अधिकारी दिपक मडके, तलाठी श्रीधर आचारी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, आरोग्य अधिकारी मकसुद शेख, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड हे उपस्थित होते.