Saturday, August 30, 2025
Latest:
खेडविधायकसामाजिक

प्रहार दिव्यांग संघटनेने दिव्यागांच्या मागण्यांची केली विचारणा : संदीप बारणे

१५ दिवसांत पूर्तता करण्याचे बीडीओ यांचे आश्वासन
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी 
राजगुरूनगर : प्रहार दिव्यांग संघटना खेड तालुका यांच्या वतीने दिव्यांगाच्या मागण्यांबाबत खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांना विचारणा करण्यात आली. यावेळी बीडीओ यांनी पंधरा दिवसात दिव्यांगांच्या मागण्यांबाबत पुर्तता हाेईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रहार दिव्यांग संघटना खेड तालुका सचिव संदीप बारणे यांनी दिली.
# संघटनेने मागितलेली माहिती पुढीलप्रमाणे :-
१) तालुक्यातील अपंगांची ग्रामपंचायत निहाय नोदणी किती याची माहिती प्रवर्ग निहाय मिळावी,
२) तालुक्यातील किती ग्रामपंचायतींनी 5% दिव्यांग निधी खर्च केला, किती नी केला नाही यांची माहिती देण्यात यावी,
३) किती ग्रामपंचायतींनी 5% गाळे बाधंले व वाटप केले याची माहिती मिळावी,
४) जिल्हा परिषदेच्या 5% निधीमधून सन 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 मध्ये दिव्यांगासाठी किती घरकुल मजुर झाली, त्यातील किती घरकुल पुर्ण, किती अपुर्ण, बांधून किती झाली या अहवालाच्या प्रत मिळाव्यात,
५) सन 2015-16 ते 2019-20 अखेर खेड पंचायत समितीने 5% निधीची वर्षनिहाय किती तरतूद केली व प्रत्येक वर्षी खर्च कशावर केला याची माहिती मिळावी,
६) पंचायत समितीच्या ठिकाणी अपंग बांधवांना बसण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात यावा व प्रत्येक ग्रामपंचायतला व्हिलचरची व्यवस्था करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!