Tuesday, December 2, 2025
Latest:
खेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागविशेषशैक्षणिक

पी के ज्युनिअर कॉलेजमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमातून कला (Art) शाखेबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय

पी के ज्युनिअर कॉलेजमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमातून कला (Art) शाखेबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय

महाबुलेटीन न्यूज
चाकण : पी के फाऊंडेशन संचलित पी के कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून इंग्रजी माध्यमातून आर्ट (कला) विद्याशाखा शिक्षणाची सोय तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवार, दि. 19 जुलै 2021 पासून इयत्ता अकरावी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स विद्याशाखांचे नवीन प्रवेश सुरु करण्यात आलेले असून प्रवेश कक्षाचे उद्घाटन संस्थेच्या प्रतिनिधी कु. निकिता खांडेभराड यांच्या हस्ते करण्यात आले. ज्युनिअर कॉलेज द्वारे यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातील सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन तसेच पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेमार्फत एमपीएससी/ यूपीएससी फाउंडेशन कोर्स, लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम तसेच एनसीसी प्रशिक्षण असे प्रशिक्षणात्मक कोर्स, तर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, इन्शुरन्स, मार्केटिंग असे स्किल कोर्स अशा कॉम्बिनेशन अभ्यासक्रमाची रचना केल्याचे निकिता खांडेभराड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणासाठी ज्युनिअर कॉलेजने मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करार केला असून मायक्रोसॉफ्ट क्लासरुम हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तुलनेत गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे याकरिता कॉलेजने तीन मोबाईल ॲप लॉन्च केले असून पहिले विद्यार्थी व पालकांना प्रशासकीय कामकाजासाठी, दुसरे सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नीट, जेईई, एमएच-सीईटी मार्गदर्शन व सरावासाठी तर तिसरे विद्यार्थी व पालकांना ग्रंथालय सुविधा डिजिटल स्वरुपात उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आली असल्याचे प्राचार्य रोहिदास भोर यांनी सांगितले.

याप्रसंगी पी के टेक्निकल कॅम्पसचे प्रा. अविनाश हांडे, पी के पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख प्रा. किशोर जाधव, प्रा. सचिन कोकणे, प्रा. मनीषा अरगडे, प्रा. परेश पंडित, प्रा. प्रियांका राऊत, प्रा. मैनूद्दीन पठाण उपस्तिथ होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रतापराव खांडेभराड व सेक्रेटरी सौ. नंदाताई खांडेभराड यांनी या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!