Friday, April 18, 2025
Latest:
गुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणेराजकीयविशेष

पिपंरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या..

पिपंरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या..

महाबुलेटीन न्यूज 
पिपंरी-चिंचवड : पिपंरी चिंचवडमध्ये एक धक्कदायक घटना घडलेली समोर आलेली आहे. शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 

या घटनेत डोक्याला गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रसन्न चिंचवडे असे मृत मुलाचं नाव असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले या बाबत आता वेगवेगळच्या चर्चा सुरु झाल्या आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच शांतता पसरली आहे.

रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिंचवडे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चिंचवडे कुटुंब राहते. रात्री नऊच्या सुमारास प्रसन्न याने कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला आणि वडिलाच्या परवानाधारक पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!