पिंपरी चिंचवड शहरात 16 तारखेपासून या हॉस्पिटलमध्ये मिळणार कोरोनाची लस
महाबुलेटीन न्यूज
पिंपरी : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार संपूर्ण देशामध्ये कोविड 19 चे लसीकरण करण्यात येणार आहे. करोना महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-19 लसीकरण शनिवार (दि.16) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातही शनिवारपासून लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.
शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोविड -19 लसीकरणासाठी शहरातील 16 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआय रुग्णालय, कामत हॉस्पिटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, ऍक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल, स्टर्लिंग हॉस्पिटल ऍण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पिंपळे निलख दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.