पत्रकार सुभाष भोर यांचे निधन…
पत्रकार सुभाष भोर यांचे निधन…
महाबुलेटीन न्यूज
जुन्नर / नारायणगाव : जुन्नर तालुका पत्रकार संघाचे माजी सचिव व दैनिक नवाकाळचे प्रतिनिधी सुभाष शांताराम भोर (वय ३९ रा. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचे आज ( दि. १० ) हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता सह विविध क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पुणे जिल्हा पत्रकार संघ व हुतात्मा राजगुरू पत्रकार खेड तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.