पत्रकार दिनानिमित्त कोविडच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा घरी जाऊन सन्मान
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तळेगाव शहरातील पत्रकार बंधूना मराठी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी नगरसेवक तथा संघटनमंत्री सचिन टकले, नगरसेविका शोभाताई भेगडे, काजलताई गटे, सरचिटणीस प्रमोद देशक, विनायकजी भेगडे, महिला आघाडी अध्यक्षा स्टेशन विभाग अंजलीताई जोगळेकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील कांबळे, प्रसिद्धी प्रमुख महेश सोनपावले आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीचा स्तंभ म्हणून निर्भीड, निःपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीला भक्कम करणार्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोविड१९च्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या निवासस्थानी जाऊन
हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती
शहराध्यक्ष रवींद्र माने आणि प्रसिद्धी प्रमुख महेश सोनपावले यांनी दिली.