पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा : मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांचे आवाहन
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा : मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांचे आवाहन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : शहरामध्ये सन २०२२ मधील गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्यानुषंगाने पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत चाकण नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी आवाहन केले आहे. तसेचचाकण नगरपरिषद हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती नगरपरिषदेने नियोजित केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावरच द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
१) गणेश मूर्ती संकलन केंद्रावर देण्यापूर्वी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घरातच आरती/ पूजा करण्यात यावी.
२) गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करावा.
३) कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढताना ध्वनी प्रदूषण टाळावे.
४) गणेश मंडळाने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
५) पी. ओ. पी. च्या मूर्ती वापरणे टाळावे.
६) गृहरचना सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीमधील सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन सोसायटीच्या परिसरामध्येच करावे आणि सदर मूर्तीसंकलन केंद्रावर आणून द्याव्यात.
७) निर्माल्य नगरपरिषदेच्या निर्माल्य संकलन गाडीमधेच टाकावे.
८) प्लास्टिकपासून बनवलेले देखावे टाळावेत.
९) शासन नियमांचे पालन करून प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करावा.
त्यानुषंगाने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चाकण नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
0000