‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून निराधार महिलेच्या घराचे पत्रे बदलून केली डागडुजी…
‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून निराधार महिलेच्या घराची पत्रे बदलून डागडुजी…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील एका निराधार महिलेच्या घराची पत्रे बदलून डागडुजी करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपूर्वी कुंदा पारसकर ( रा. रामनगर नाणेकरवाडी, चाकण ) यांनी पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे घरावरील पत्र बदलण्याची मागणी केली. त्यांना पावसाळ्यातील होत असलेल्या त्रासामुळे आणि घरात कुणी कर्ता पुरुष नसल्यामुळे त्यांनी फाउंडेशनला पत्र पाठविले होते. नेहमी प्रमाणे फाउंडेशनने “मदत नव्हे कर्तव्य” या संकल्पनेतून कुंदा पारसकर यांना त्यांच्या घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे व घराची डागडुजी करुन दिली. यावेळी नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे, उपसरपंच वासुदेव नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब नाणेकर व इतर सदस्य यांनीही मदत करून एक हात मदतीचा दिला.