ओईएन कंपनीचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
ओईएन कंपनीचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील WMDC जवळील ओइएन इंडिया लिमिटेड या कंपनीने आपले सांडपाणी रस्त्यावर सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सांडपाणी जमिनीत झिरपून जवळील विहीर व बोअरवेल मध्ये गेल्याने पाणी खराब झाले आहे. पिण्याचे पाणी खराब होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
——-