निधनवार्ता : भामाबाई तुकाराम सांडभोर
सांडभोर परिवारावरील आईचे छत्र हरपले
महाबुलेटीन न्युज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड पंचक्रोशीतील सांडभोरवाडी येथील जेष्ठ आदर्श माता गं. भा. भामाबाई तुकाराम सांडभोर (वय ८० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, सूना, मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महावितरणचे कर्मचारी ज्ञानेश्वर सांडभोर, साई नर्सरीचे सुधाकर सांडभोर, सह्याद्री स्कूलचे पदाधिकारी संदीप सांडभोर यांच्या त्या मातोश्री होत.