निधन वार्ता : श्रीमती सरस्वती रतनलाल परदेशी
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, नेहरू चौकातील हनुमान मंदिर काकड आरती सोहळ्यातील जेष्ठ सांप्रदायिक वारकरी व हनुमान महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वती रतनलाल परदेशी ( वय ७४ ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चाकण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राहुलशेठ परदेशी यांच्या त्या मातोश्री, तर रोटरीचे माजी उपप्रांतपाल धीरजशेठ परदेशी यांच्या त्या चुलती होत.
—