पीडीसीसी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी शिवाजी मिंडे साहेब यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे इंगळे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी व म्हाळुंगे येथील श्रीपती बाबा महाराज नाट्य-क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी (आण्णा ) दगडू मिंडे साहेब ( वय ७४ वर्षे ) यांचे दुःखद निधन झाले.
त्यांनी बँकेच्या चाकण व भोसे या शाखांत काम करून परिसरातील शेतकऱ्यांना उत्तम सेवा दिली. खेड तालुक्याचे दिवंगत मा. आमदार साहेबराव सातकर यांचे ते विश्वासू सहकारी मित्र होते. आप्पासाहेब व त्यांच्या कुटुंबीयांशी मिंडे आण्णांचा विशेष लोभ होता. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक ॲड. जीवन मिंडे, सुधीर मिंडे व मंगेश मिंडे यांचे ते वडील होत.