सुरज वाडेकर यांना मातृशोक
मंजुषा वाडेकर यांचे निधन
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : बेकरी क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील अग्रनामांकित बेकरी व्यवसायिक व भाजपचे खेड तालुका माजी सरचिटणीस दत्तात्रय वाडेकर यांच्या सौभाग्यवती मंजुषा दत्तात्रेय वाडेकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्युसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या.
मंजुषा वाडेकर यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजगुरुनगर येथील प्रतिथयश जनता बेकरीच्या त्या संचालक होत्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पती दत्तात्रेय वाडेकर यांच्या खांद्याला खांदा लावून बेकरी व्यवसाय वाढवला. या व्यवसायात त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. गुणवत्तेच्या आधारावर जनता बेकरीने पुणे जिल्ह्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केले. यात मंजुषा वाडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. पारंपारिक बेकरी व्यवसायाला छेद देत त्यास आधुनिकतेची जोड देणाऱ्या मंजुषा वाडेकर आजारपणामुळे काळाच्या पडद्याआड गेल्या. आपल्या सात्विक वाणीने आणि वागण्याने सौ. मंजुषा यांची राजगुरूनगरमध्ये वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने राजगुरुनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर राजगुरूनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी 22 मार्च रोजी राजगुरुनगर येथे सकाळी आठ वाजता भीमा नदी तीरावर होणार आहे.
——-