निधन वार्ता : भास्कर जाधव

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : श्री क्षेत्र महाळुंगे आध्यात्मिक नगरीतील जेष्ठ नागरीक, श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराज यांचे निस्सिम भक्त व पायी पालखी सोहळ्यातील वारकरी ह.भ.प. भास्कर काळुराम जाधव ( वय ७१ ) यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सिद्धांत कॉलेज मधील कर्मचारी शाम जाधव, उद्योजक निलेश जाधव, उद्योजक सचिन जाधव यांचे ते वडील, तर जेष्ठ कार्यकर्ते जालिंदर जाधव, वसंत जाधव व शिवाजी जाधव यांचे ते बंधू होत.