Thursday, August 28, 2025
Latest:
दिल्लीनिवड/नियुक्ती

New Delhi : शरद पवार यांचे छायाचित्र का वापरता? अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल !

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News
New Delhi : नवी दिल्ली :
महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शरद पवार यांचे छायाचित्र वापरल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फटकारले. निवडणूक प्रचारासाठी शरद पवारांच्या चित्राचा वापर का करता?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला केला.

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. त्यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहात. मग त्यांचे चित्र का वापरणार?. आता तुम्ही तुमची स्वतःची ओळख घेऊन जनतेसमोर जा. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवार गटाच्या याचिकेवर शनिवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी १९ मार्च ही तारीख दिली. राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांनी नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप शरद पवार गटाने आपल्या याचिकेत केला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटास उत्तर देण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!