एन डी आर एफ कडून संतभारती ग्रंथालयास पुस्तके भेट
एन डी आर एफ कडून संतभारती ग्रंथालयास पुस्तके भेट
महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयास केंद्रीय गृह मंत्रालय अंगीकृत राष्ट्रीय आपदा सेवा दल ( नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ) एनडीआरएफ तर्फे बटालियन 5 चे कामांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी इन्स्पेक्टर अशोककुमार, सुनील पाटील, अनिलकुमार पासवान, शिवशंकर, गणेश भालेराव, सरपंच संदेश साळवे, उपसरपंच रावसाहेब नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच वासुदेव नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इन्स्पेक्टर अशोककुमार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ग्रंथालयाच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.
संतभारती ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष व खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प व पुस्तके भेट देऊन स्वागत केले, तर ग्रंथालयाच्या सचिव व महिला लैंगिक शोषण तक्रार समिती NDRF च्या सदस्या मंगलताई देवकर आणि ग्रंथपाल सुवर्णा कोलते यांनी आभार मानले.