Sunday, August 31, 2025
Latest:
काव्यमंचविशेष

काव्यमंच : जागर ( नवरात्री विशेष )

*📚 ✍जागर✍📚

नऊ दिवस उत्सव
नऊ रात्रींचा नौरात्री
नित आमुचा उत्सव
नित्य पुजितो सावित्री ॥धृ॥

मुर्ती स्थापिली हृदयी
जोति आणखी सावित्री
विश्व बनवू साक्षर
आम्ही शिक्षणाचे यात्री॥१॥

क्षण क्षण शिक्षणाचा
शिका म्हणे ग सावित्री
आम्हा साठी शिक्षणाची
गेली राखून गंगोत्री॥२॥

आजवरी अखंडीत
नित वाहते गंगोत्री
अस्त हिला न ठाऊक
सदा वाहण्याची खात्री॥३॥

हिला नको कोणत्याही
नऊ दिन नऊ रात्री
हिचा जागर जागर
पहा चाले अहोरात्री॥४॥

– निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे, धुळे.
••○○○••••○○○••••○○○••••○○○••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!