Friday, May 9, 2025
Latest:
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यावर एका महिन्यात तिसरा गुन्हा दाखल ● अरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यावर एका महिन्यात तिसरा गुन्हा दाखल
अरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

महाबुलेटीन न्यूज : विशेष प्रतिनिधी 
नारायणगाव : येथील शेतकरी अरूण मार्तंड पाटे (वय ५४ रा. नारायणवाडी) यांना गणपती मंडळात झालेल्या वादातून बेदम मारहाण केल्याप्रकरणी १५ ऑगस्ट २०१७ रोजी नारायणगाव पोलिस स्थानकामध्ये येथील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या घटनेचे मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी असलेले नारायणगावचे सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादाभाऊ खैरे व सुनील रामदास खैरे या तीन जणांवर त्या वेळी गुन्हा दाखल झाला नव्हता. 

फिर्यादी अरुण मार्तंड पाटे यांनी जुन्नर न्यायालयामध्ये याबाबत फौजदारी आचारसंहिता कलम १५६/३ प्रमाणे घटना घडल्यानंतर काही दिवसांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जुन्नर न्यायालयाने नारायणगावचे विद्यमान सरपंच योगेश नामदेव पाटे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारायणगाव पोलिसांना नुकतेच दिले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. 

दरम्यान या घटनेमधील सचिन सुरेश नरवडे, संदीप सुरेश नरवडे, सोमनाथ मारुती तोडकरी, विकास शंकर म्हस्के, कमलेश किसन गावडे व सुजित संजय गाडेकर यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे.

या सर्व आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०१७ भा.द.वि. कलम ३२६,३२५,३२४,१४३,१४७,१४८,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

● या घटनेमुळे विद्यमान सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांच्यावर गेल्या महिन्याभरात हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी १७ मार्च २०१९ रोजी नारायणगाव येथील शेतकरी अमोल तांबे व त्यांची पत्नी शुभांगी यांना मारहाण केल्याप्रकरणी तसेच चाळकवाडी येथील टोल नाक्यावर पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे सरपंच योगेश पाटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!