नाणेकरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा… शिष्यवृत्ती परीक्षेत मुलींची भरारी…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी ( ता. खेड ) या शाळेतील विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले आहे.
● पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मधील शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
———————–
कु. स्नेहल आलदर – 250 गुण, कु. भाग्यश्री शेलार – 233 गुण, कु. पल्लवी भोकटे – 230 गुण, कु. ऋतुजा झटकवडे – 230 गुण, कु. तनुजा मोरे – 224 गुण.
ह्या विद्यार्थिनींना सौ. अरुणा दत्तात्रय शेवकरी तसेच सौ. मनीषा थिटे, सौ. अश्विनी सावळकर, श्रीमती शमीम तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-धारक बनण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे यांच्याकडून प्रेरणा मिळाली. तसेच विस्ताराधिकारी श्री. जीवन कोकणे, श्री. सुरेश कातोरे, केंद्रप्रमुख श्री. हिरामण कुसाळकर, मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी दाते यांचेदेखील मार्गदर्शन मिळाले. यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांचे नाणेकरवाडीतील समस्त ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. संजय जाधव, उपाध्यक्ष सौ. साधना नाणेकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.