Thursday, April 17, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेषशैक्षणिकसत्कार / सन्मान / पुरस्कार

नाणेकरवाडी शाळेच्या शिक्षिका मनिषा धुमाळ-देवरे यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

नाणेकरवाडी शाळेच्या शिक्षिका मनिषा धुमाळदेवरे यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

महाबुलेटीन न्यूज

चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील जिल्हा परिषद शाळेतील श्रीमती मनिषा धुमाळदेवरे यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्शशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नुकतेच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्रीचंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या मनिषा धुमाळ या विद्यार्थी घडविताना सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन मार्गदर्शनकरतात. राज्य पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस त्यांचे मार्गदर्शन लाभले. नाणेकरवाडीच्या सलग शिष्यवृत्ती पात्रविद्यार्थी येण्यामध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. शाळेतील शैक्षणिकक्रीडासांस्कृतिक विकासात देखील त्यांचे नेहमीच मार्गदर्शन सहभाग असतो. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,  शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तारअधिकारी जीवन कोकणे, श्रीरंग चिमटे, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर, नाणेकरवाडीचे मुख्याध्यापक संदिप महादू नाणेकर सर्व शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती धुमाळ यांचे नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे, उपसरपंच पूनम नाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय जाधवसमस्त ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!