Tuesday, March 10, 2026
Latest:
अहमदनगरखेडखेड विभागनिधन वार्तापुणे जिल्हामहाराष्ट्र

मुलाच्या निधनाच्या धक्क्याने वडीलांचाही मृत्यू

 

उनधरे सरांच्या वडिलांचा मृत्यू

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेतील निवृत्त क्रीडा शिक्षक रामदास गणपत उनधरे ( वय ६५, चाकण ) यांच्या आकस्मिक मृत्यूचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या वडीलांचा नगर जिल्ह्यात राहत्या घरी मृत्यू झाला आहे. उनधरे सर यांच्या काल छातीत दुखू लागल्याने पिंपरी चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या वडिलांनीही पुत्र शोकाने आपले प्राण सोडले. त्यामुळे चाकण परिसरात दुःखाची छाया पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!