Thursday, August 28, 2025
Latest:
पुणे जिल्हामावळविशेषशैक्षणिक

मोठी स्वप्ने पाहिल्याशिवाय मोठे होता येत नाही : बाळा भेगडे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे : देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाने प्रेरीत व्हावे. गुणवंत विद्यार्थी ही शैक्षणिक संस्थेची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. मोठी स्वप्ने पाहिल्या शिवाय मोठे होता येत नाही.शिक्षणाने विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्यातील क्षमता ओळखता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे यांनी केले. 

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के,
सहसचिव नंदकुमार शेलार, सल्लागार सुरेशभाई शहा, गणपतराव काळोखे, नवीन समर्थ ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष महेशभाई शाह, संचालक वसंतराव भेगडे, एस. एन. गोपाळे, शंकरराव नारखेडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, डॉ. ललितकुमार वधवा, प्राचार्य कैलास पारधी, डॉ. जयश्री सुरवसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बाळा भेगडे पुढे म्हणाले, लोकमान्य टिळक आणि अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा नावलौकिक मोठा आहे. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपली ध्येय साध्य करावीत.

संतोष खांडगे म्हणाले, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांनी जबाबादारीने वागले पाहिजे. आपले उच्च ध्येय साध्य करावे. आत्मविश्वासाने शैक्षणिक आव्हानांना सामोरे जावे. संस्थेतील शिक्षक प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत. आधुनिक प्रयोगशाळा आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवावा.

यावेळी डॉ. गिरीष देसाई यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. शुभांगी सफई, अदिती कराळे, अथर्व होमकर, सिद्देश जाधव, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ. जयश्री सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव रणशूर यांनी केले. महेशभाई शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. जयश्री सुरवसे, ज्येष्ठ अध्यापक पांडुरंग पोटे, संजय कसाबी यांनी केले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!