Saturday, August 30, 2025
Latest:
खेडदिन विशेषपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

एम आय टी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आळंदी ( प्रतिनिधी ) : येथील एमआयटी मध्ये २००८ पासून, ११ नोव्हेंबर हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक दिन म्हणून साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते आणि ते महान स्वातंत्र्यसेनानी आणि महान शिक्षणतज्ज्ञ होते. या निमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग, विद्यार्थी विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांनी सोमवारी गूगल मीट प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने “राष्ट्रीय शिक्षण दिन” साजरा केला.

एमआयटीत संत ज्ञानेश्वर बी. एड. चे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हरकल यांचे “सामाजिक विकासातील शिक्षणाची भूमिका आणि महत्त्व” या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. सुरेंद्र हर्काळ सर यांनी आपल्या अनोख्या शैलीत विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व विशद केले आणि हे स्पष्ट केले की, सन २०२० हे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तनाचे मैलाचा दगड आहे. या कार्यक्रामाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अर्चना आहेर यांनी केले. या कार्यक्रमात प्रकल्प संचालक विजय खोडे, प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, कुलसचिव संदीप रोहीनकर, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ग्रंथपाल प्रा. राहुल बाराथे, सुनीत साबळे, सारिका पडवळ, विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. मंगेश भोपेळे आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रो. श्रीराम करगावकर यांनी परिश्रम घेतले. ग्रंथपाल प्रा. राहुल बाराथे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!