मेजर अमृतलाल परदेशी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : भारतीय लष्कराच्या सीमा सुरक्षा दलातील निवृत्त मेजर व चाकणचे सुपुत्र अमृतलाल रामलाल परदेशी ( वय ६१ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी ओरिसा, बिहार, जम्मू- काश्मीर आदी राज्यात देशसेवा केली. त्यांच्यामागे एक मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन परदेशी यांचे ते वडील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयप्रकाश परदेशी यांचे ते मेहुणे होत.