माझी राष्ट्रपतींसोबत संस्मरणीय आठवण…..
माझी राष्ट्रपतींसोबत संस्मरणीय आठवण…..
देशातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असणारे माजी राष्ट्रपती तसेच माजी अर्थमंत्री ,संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे आज दुःखद निधन झाले.
या निमित्ताने त्यांच्या काही स्मृती ..
राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे उपस्थित राहून आम्हाला भारतरत्न मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा २ तासांचा सहवास व विचार ऐकण्याचे भाग्य लाभले हा तर जीवनातील एक असामान्य योगच म्हणावा लागेल.
हुतात्मा राजगुरू यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे दि. 22 मार्च 2013 रोजी आयोजित केले होते. तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला तसेच पुणे जिल्ह्यातील निवडक पत्रकारांना लाभले होते.
आज भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त समजले, या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट व ऐकलेले विचार निश्चित आठवले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना महाबुलेटीनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
👏👏🌷🌷💐💐🌹🌹🌹
— हनुमंत देवकर, जेष्ठ पत्रकार
संपादक महाबुलेटीन न्यूज