मयत रिक्षा चालकांच्या वारसांना प्रत्येकी २० हजाराची आर्थिक मदत
भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा विकास समिती व तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघाचा उपक्रम
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : विमा संरक्षणा अभावी लाभापासून वंचित असलेल्या दोन मयत रिक्षा चालकांच्या वारसांना प्रत्येकी
२० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली. दिवाळी भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर मानवता दृष्टीकोनातून जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे आणि तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघाच्या वतीने ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मयत रिक्षा चालक संतोष रोहिटे आणि राम मोरे यांच्या वारसांकडे ही आर्थिक मदत नुकतीच सुपूर्द करण्यात आली. यावेळी तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघाचे अध्यक्ष दिलीप डोळस, प्रशांत शिंदे, राजू टकले, शंकर स्वामी, प्रसाद करपे, प्रशांत गवारे आणि पदाधिकारी रिक्षाचालक उपस्थित होते.
विमा संरक्षण नसल्याने तळेगाव शहरातील अनेक रिक्षाचालक
अडचणीत आले आहेत. आपल्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करून त्यांनी तातडीने पंतप्रधान जीवन ज्योती विमा ३३० रुपये व १२ रुपये भरून अपघाती विमा काढावा. रिक्षाचा विमा ६ हजार ६०० , जो रिक्षाचालक अधिक ३ प्रवासी यांचे संरक्षण करतो. हे विमा वार्षिक असून आपल्या परिवाराला संरक्षण द्यावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोळस यांनी केले आहे.