Sunday, April 20, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपंढरपूरपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रयात्राविशेष

माऊलींच्या अश्वाचे हरिनाम गजरात आळंदीत आगमन

माऊलींच्या अश्वाचे हरिनाम गजरात आळंदीत आगमन

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले. पालखी सोहळ्यातील परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने आळंदीचे वेशीवर हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले.

श्रींचे अश्वाचे अंकली (ता. चिकोडी, बेळगावी, कर्नाटक) येथील राजवाड्यातून अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. प्रवासानंतर आळंदीत प्रवेश करण्यापूर्वी अश्व प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर सरदार बिडकर वाड्यात विसावले. येथे हरप्रीतसिंग बिडकर सरदार, उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांचे तर्फे अश्वपूजा स्वागत करण्यात आले.

बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप मिळताच श्री गुरु हैबतराव बाबा यांचे दिंडीने प्रथा परंपरेने अश्वाचे स्वागत केले. यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश जाधव, गुप्त विभागाचे मच्छिंद्र शेंडे, पालखी सोहळ्याचे मालक कृषिकेश राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, श्रींचे सेवक चोपदार रामभाऊ रंधवे, मानकरी सूरज आरु, कर्णा सेवेचे मानकरी भीमजी वाघमारे, बल्लाळेश्वर वाघमारे आदीसह भाविक, वारकरी कोरोनाचे पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात उपस्थित होते.

सनईचे वादनात, हरीनाम गजर करीत मोजके भाविक अश्व दर्शनास आले. अश्व माउली मंदिरात आल्यानंतर पालखी सोहळ्याचे मालक कृषिकेश राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींचे अश्वाचे स्वागत केले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा, कारंजा मंडपात संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली. मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला. अश्वपूजेनंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहचले. दरम्यान रात्री मंदिरात गुरुवारची श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा नंतर आरती झाली.
००००
फोटो ओळ : आळंदीत श्रींचे अश्व सेवेचे मालक मानकरी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत अश्वांचा हरिनाम गजरात प्रवेश झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!