Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनामावळविशेष

मास्क न वापरणाऱ्यांवर वडगाव येथे कारवाई

महाबुलेटिन न्युज/तुषार वहिले
वडगाव मावळ : तालुक्यात वडगाव येथे मास्क न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाअधिकारी पुणे यांच्याकडील आदेश क्र.जि का./क्र. आ.व्य./कावी/१८१८/२०२० दिनांक २५/०१/२०२० नुसार नागरपंचायतीकडून कारवाई करण्यात येत आहे.

वडगाव हे तालुक्याचे गाव असल्याने येथे न्यायालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, तालुका कृषी कार्यालय आदी असून असंख्य नागरिकांची ये-जा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांच्यात समाधान व्यक्त करण्यात आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!