Saturday, August 30, 2025
Latest:
गुन्हेगारीजुन्नरपुणे जिल्हाविशेष

मास्क घालून हल्ला करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी केली अटक

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

नारायणगाव : खोडद येथील वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर तोंडाला मास्क घालून हल्ला करणाऱ्या ६ जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना जुन्नर न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या घटनेमधील साहिल रफिक मुलानी वय २४ वर्षे , गोटया उर्फ विनायक शंकर जाधव वय २९, दोघेही रा. पाटे खैरे मळा, नारायणगाव, तालुका जुन्नर, मोंटी छोटूलाल सिंग वय २४, रा. वाजगे आळी, नारायणगाव, तालुका जुन्नर,सनी रमेश तलवार वय २४, अक्षय रमेश तलवार वय २०, किरण संतोष शिंदे वय १९, तिघेही रा. पेठ आळी, नारायणगाव, तालुका जुन्नर यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत प्रसाद चिंतामणी हिंगे (वय २६) रा. खोडद, ता. जुन्नर यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी अनोळखी ६ जणांवर भा.द.वि. कलम १४१, १४३, १४७, ३४१, ३२३, ४०३, ५०४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रसाद हिंगे हे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दि. ९ रोजी सायंकाळी ५.२० वा. नारायणगाव येथील पुणे – नाशिक महामार्गावरील गोविंद प्लाझा समोरून जात असताना तीन मोटर सायकलवरून आलेल्या ६ जणांनी त्यांना आडवून धमकी देऊन जुन्या व्यवहाराचा राग मनात धरून हिंगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोटरकारचे नुकसान केले. तसेच मारहाणीत त्यांच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्यांची चैन देखील त्या मारहाणीत कोठेतरी पडली आहे, अशी फिर्यादी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून ६ जणांचा शोध घेतला.

गाडी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून जर वाद झाला असेल तर त्या सहा जणांनी कायद्याचा आधार घ्यायला हवा होता. त्यांनी कायदा का हातात घेतला असा सवाल फिर्यादी प्रसाद हिंगे यांनी केला आहे. या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल असून मोठे राजकारण असल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पुढील दिवसात यामागे नक्की कोण सूत्रधार आहे हे देखील काही दिवसातच स्पष्ट होईल. असे असताना हा वाद सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!