मराठा क्रांती मोर्चाचे उद्यापासून खेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सोमवार ( दि. ५ ) सकाळी साडे दहा पासून खेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. तहसील कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांनी मंडप टाकून आंदोलनाची जय्यत तयारी केली आहे.
