मंचरच्या चाईल्ड कोविड सेंटर मधून 2 वर्षाच्या बालकाची कोरोनावर यशस्वी मात…कष्टाचं चीज झालं : दत्ताभाऊ गांजाळे
मंचरच्या चाईल्ड कोविड सेंटर मधून 2 वर्षाच्या बालकाची कोरोनावर यशस्वी मात…कष्टाचं चीज झालं : दत्ताभाऊ गांजाळे
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मंचर : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम या नावाने लोकमान्य प्रतिष्ठान व B4S सोलुशन संचालित मंचर ( ता. आंबेगाव ) येथे चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरु असून सध्या 16 रुग्ण (लहान मुले व पालक) मोफत उपचार घेत आहेत, या चाईल्ड कोविड सेंटरमधील पहिला रुग्ण राजवीर नवले (वय 2 वर्ष) यांस आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर सुखरूप आई वडिलांच्या कुशीत सुपूर्द केले.
“या चाईल्ड कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठीय अनेक खेळणी आणि मनोरंजनात्मक असल्याने मुलंही इथ रमत आहेत. त्याचप्रमाणे या कोविड सेंटर मध्ये रात्रंदिवस मोफत वैद्यकीय सुविधा देणारे डॉ. सोमेश्वर टाके, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जगदाळे, डॉ. सदाकतअली सय्यद आणि सर्व परिचारिका विशेष काळजी घेत आहेत. आपण येथे देत असलेल्या सोई सुविधा लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतं. यासाठी माझ्या मित्रपरिवाराचे योगदान खुप मोठे आहे. पालकांनी देखील घाबरून न जाता लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी”, असे आवाहन माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी केले आहे.
००००