भाजप नेते, माजी सरपंच रामदास मेदनकर अनंतात विलीन मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांचे निधन
भाजप नेते, माजी सरपंच रामदास मेदनकर अनंतात विलीन
मेदनकरवाडीचे माजी सरपंच रामदास मेदनकर यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, शरद सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भाजप नेते व मेदनकरवाडी ( ता.खेड ) ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामदास मुरलीधर मेदनकर ( वय ५७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुरेखा मेदनकर, मुलगा ग्रा.पं. सदस्य, वकील संकेत मेदनकर, मुलगी माजी सरपंच व भाजप युवती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रियांका मेदनकर-चौधरी, जावई सोरतापवाडीचे माजी सरपंच व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन चौधरी असा परिवार आहे.
मागील वर्षी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंच प्रियांका यांच्याशी मन की बात अंतर्गत संवाद साधून त्यांचे कौतुक केले होते. ग्रामपंचायतीच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत स्वतःच्या कुटुंबातील एकाचवेळी तीन सदस्य निवडून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांनी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षातून आपला राजकीय प्रवास केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक होते, तर मागील दहा वर्षांपासून त्यांनी माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचे कट्टर समर्थक म्हणून काम केले. मागील एक महिन्यापासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
—–