अखेर कोविडने गाठलेच…
माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांना कोरोनाची लागण
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेडचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून जनतेला पुढील संदेश देऊन कळविले आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसली असता त्यांनी आपली तपासणी करून घेतली. बुधवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना चाकण मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच….असे भावुक भावना माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी सोशल मीडिया द्वारे व्यक्त केल्या आहेत.
चाकणमध्ये रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच रहा-सुरक्षित रहा, शासनाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे..
– आपला सुरेश गोरे