महाराष्ट्रात उद्यापासून कडक लॉकडाऊन : मुख्यमंत्री करणार घोषणा ● दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द
महाराष्ट्रात उद्यापासून कडक लॉकडाऊन : मुख्यमंत्र्यांची घोषणा
● दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : महाराष्ट्रामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, दहावीच्या बोर्डाची परीक्षा ही रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यामध्ये दहावीच्या परीक्षा कधी होणार याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र राज्यात संकट अधिकच भीषण होत चालले असून मुलांची सुरक्षितता लक्षात घेता परीक्षा घेणे योग्य होणार नसल्याने या परीक्षा पुढे घेण्यात येतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
——-