महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी संतोषभाऊ गायकवाड
महाबुलेटीन न्यूज
चाकण : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी संतोषभाऊ गायकवाड यांची निवड झाली. मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पञ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वरवंड येथे नाभीक समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज व शिवा काशीद यांच्या प्रतीमेचे दिपप्रज्वलन पुजन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय अनारसे, सुभाष अप्पा जाधव, आप्पासाहेब पंडीत, निलेशभाऊ पांडे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा महीला नाभीक संघटनेच्या अध्यक्षपदी सारीकाताई शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री सचिन (आबा) गायकवाड पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री संतोष गायकवाड पुणे जिल्हा मुख्य संघटक पदी श्री चंद्रकांत भालेकर यांची निवड करण्यात आली, त्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
तसेच महिला मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा संघटक पदी श्री उमेश राऊत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा संघटक उमेश राऊत, दौंड तालुका अध्यक्ष श्री गणेश साळंके, श्री संतोष पंडीत, श्री बंड सर, पुढारीचे पत्रकार श्री नितीन राऊत, मोरे साहेब, वरवंड गावचे सरपंच श्री गोरख आण्णा दिवेकर, लोकमतचे पत्रकार श्री दिपक जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेश पांडे, श्री अप्पासाहेब पंडीत, महाराष्ट्र राज्याचे नाभीक कोअर कमिटी अध्यक्ष श्री सुभाषअप्पा जाधव, महाराष्ट्र राज्य नाभीक प्रदेश अध्यक्ष श्री दत्तात्रय अनारसे यांनी मनोगत व्यक्त केले.
दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश साळुंके व महीला अध्यक्षपदी सौ अश्वीनीताई बंड यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडी नंतर अध्यक्ष श्री गणेश साळुके यांनी दौंड तालुका कार्यकारणीची पुन्हा फेरनिवड केली. यावेळी चंद्रकांत रसाळ, महेश दलवी आणि समाज बांधव उपस्थित होते.