Saturday, August 30, 2025
Latest:
आंबेगावनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाविशेष

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आंबेगाव तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर, तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे दिलीप धुमाळ, तर उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे अविनाश घोलप व जनशक्तीचे मिलिंद टेमकर यांची निवड

पत्रकार बांधवांना हेल्मेट वितरण

महाबुलेटीन न्यूज : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आंबेगाव तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे आदर्श प्रतिनिधी दिलीप धुमाळ, उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे प्रतिनिधी अविनाश घोलप, जनशक्तीचे प्रतिनिधी मिलिंद टेमकर यांची निवड करण्यात आली आहे. 

संघाची इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- संघाच्या कार्याध्यक्षपदी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे ब्युरो चीफ मोहसीन काठेवाडी, सचिवपदी दैनिक गावकरीचे प्रतिनिधी भानुदास बोऱ्हाडे, सहसचिवपदी आज २४ तासच्या निवेदिका स्नेहा बारवे, संपर्कप्रमुख पदी दैनिक जनप्रवास आणि दैनिक लोकमंथनचे प्रतिनिधी प्रमोद दांगट, संघटकपदी दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी डॉ. अतुलजी साबळे, सहसंघटकपदी राजू देवडे, संपर्कप्रमुख पदी दैनिक क्राईम टाइमचे प्रतिनिधी नजरअली सय्यद, सहसंघटकपदी आज २४ तास तथा शिवनेरी वार्ताचे प्रतिनिधी समिरजी गोरडे यांची निवड करण्यात आली.

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील आदर्श पत्रकारांना सद्भावना निधी अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भोर सर, जुन्नर तालुकाध्यक्ष राजेश डोके, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य सन्मा. संदीपजी खळे, टायगर टाइम्सचे संपादक प्रफुल मोरे, महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाशजी मडके इत्यादी मान्यवरांनी उपस्थित पत्रकार बांधवाना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा नेहमी पत्रकारांच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असून संघाचे संघटक संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम संघ करत आहे. पत्रकारांनी आप आपसातील हेवेदावे विसरून एकत्र येत संघाची ताकद गरज असल्याचे मत यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, अंकुश भूमकर, ज्ञानेश्वर खिरड, विकास गाडे, सावता झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोर, जुन्नर तालुकाध्यक्ष राजेश डोके, उपाध्यक्ष मंगेश रत्नाकर सर, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे संदीप खळे, दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी मनेशजी (मनोज) तळेकर, विजय साळवे, मनोहर हिंगणे, प्रदीप जाधव, अय्युबभाई शेख, पल्लवी ढोबळे, विलास काळे, तान्हाजी गाडे, प्रफुल मोरे, विलास भोर, ऋषिकेश ढोबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!