आरपीआय व्यापारी आघाडीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचा ‘कोरोना योद्धा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी’ म्हणून सन्मान
महाबुलेटीन न्यूज
म्हाळुंगे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी यांच्या वतीने म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना ‘कोरोना योद्धा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी’ म्हणून मानपत्र, शुभेच्छापत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही पत्राद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पोपट घनवट, आर पी आय व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव सचिन वाघमारे यांच्या शुभहस्ते मानपत्र देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक धनंजय सुरेश पानसरे ( पुणे जिल्हा मराठा आघाडी अध्यक्ष ), वैजनाथ मुगांवकर ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी आघाडी ), सुरेश पानसरे, विठ्ठल दिक्षिवंत, माऊली पानसरे, सचिन तेलंग, संतोष परभणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.