म्हाळुंगे चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बधाने यांच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाची कारवाई… म्हाळुंगे पोलीस चौकी ही अनाधिकृत असून हप्ते गोळा करण्यासाठीच… : आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा आरोप
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील म्हाळुंगे चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बधाने यांनी एका तक्रारदार यांच्याकडून विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच मागितल्या प्रकरणी आज लाच लुचपत विभागाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आज पदवीधर व शिक्षक मतदार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हाळुंगे चौकी ही अनाधिकृत असून हप्ते गोळा करण्यासाठी असल्याचा आरोप आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.
उपनिरीक्षक राहुल बधाने हे पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे चौकीत कार्यरत आहेत. दरम्यान एका तक्रारदार यांच्याकडून तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. याची चौकशी पोलीस उपनिरीक्षक राहुल बधाले हे करत होते. त्यावेळी त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार आज “डिमांड” चा गुन्हा उपनिरीक्षक बधाने यांच्यावर दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदर चाकणचे पोलीस ठाण्याची म्हाळुंगे चौकीच्या बाबत या अगोदरही मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या अगोदरही याच चौकीचे दोन अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल लाच घेतल्याच्या प्रकरणात निलंबित झाले आहेत. त्यामुळे म्हाळुंगे चौकीचा कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ही पोलीस चौकी अनाधिकृत असून चौकी बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे. तर आजच आमदार रोहित पवार यांना ही चौकी हप्ते गोळा करण्यासाठी असल्याचे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भर भाषणात सांगितले असतानाच आज ही कारवाई झाली आहे. यावर आता तालुक्याचे लोकप्रतिनिधी व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कडून कोणता विधायक निर्णय घेतला जातो हेच औचित्याचे ठरेल..