Saturday, August 30, 2025
Latest:
भावपूर्ण श्रद्धांजली

महाळुंगे गावात आईच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी महाळुंगकर कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण… महाळुंगकर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम

महाळुंगे इंगळे : ‘अस्थी व रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन…
वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण…
व दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’

श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे येथील सामाजिक कार्यकर्ते किसनराव महाळुंगकर (पाटील), जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष निवृत्त पोलीस बाळासाहेब महाळुंगकर (पाटील) यांच्या भावजय, सामाजिक कार्यकर्ते सुनिल रतन महाळुंगकर (पाटील) यांच्या मातोश्री व युवा उद्योजक विकास महाळुंगकर (पाटील) यांच्या आजी श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या निस्सीम भक्त कै. श्रीमती सुभद्राबाई रतन महाळुंगकर पाटील ( वय ७४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे विनोद महाळुंगकर पाटील व शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पुणे जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगकर कुटुंबीयांनी शेतातील खड्ड्यात रक्षाविसर्जन करून त्यात आंब्याची झाडे ‘स्मृती वृक्ष’ म्हणून लावण्यात आली. महाळुंगकर परिवाराने पर्यावरणपूरक उपक्रम राबवून आईच्या आठवणी जतन केल्या असून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

यावेळी किसनराव महाळुंगकर, निवृत्त पोलीस बाळासाहेब महाळुंगकर, सुनील महाळुंगकर, विकास महाळुंगकर तसेच कुटुंबातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संकल्पनेनुसार, महाळुंगकर परिवाराने पाणी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता शेतात आंब्याची झाडे लावून त्यांच्या स्मृतींचे जतन केले आहे. गावातील व्यक्तीच्या निधनानंतर ‘स्मृती वृक्ष’ लावण्याची परंपरा गावातील ग्रामस्थांनी सातत्याने चालू ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!