Sunday, April 20, 2025
Latest:
कोरोनाखेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने कोविड सेंटरमधील रुग्णांना मिनरल वॉटर

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
महाळुंगे इंगळे : खेड तालुक्यातील जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने महाळुंगे कोविड केअर सेंटरला बाटलीबंद मिनरल वॉटर बॉक्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास (आबा) धनवटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, उपसभापती ज्योतीताई आरगडे, मा. उपसभापती भगवान पोखरकर, उपतालुका प्रमुख केशव आरगडे, मा. उपसरपंच गणेश पर्‍हाड, कोविड सेंटरच्या व्यवस्थापिका डॉ. अपेक्षा बोरकर, डॉ. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पारासूर, मानव अधिकार उपाध्यक्ष बाळासाहेब ताये, दादा महाळुंगकर, अशोक सोनवणे, रामचंद्र कड, दत्तात्रय मोरे, श्रीनाथ लांडे, भानुदास येळवंडे, तेजस धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

जय भोले अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना खिचडी व केळी वाटप करण्यात येते.मंडळाची दरवर्षी अमरनाथ यात्रेला सहल जाते, त्यात शेकडो कार्यकर्ते व भाविक सहभागी होतात, यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली असून येथील कोविड सेंटरला रुग्णांसाठी मिनरल वॉटरचे वाटप करण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!