Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनाखेडपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. २९ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात नव्याने २५ रुग्ण आढळले, ३रुग्णांचा मृत्यू, 

 

नगरपरिषद हद्दीत १७, तर ग्रामीण भागात ८ रुग्णांची वाढ,
आळंदीत सर्वाधिक १४ रुग्ण, ८८१३ रुग्ण बरे होऊन गेले घरी, एकूण रुग्णांची संख्या ९१९८

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.२९ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने २५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज आळंदी शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल राजगुरूनगर शहरात ३ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ८ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८८१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात १७, तर ग्रामीण भागात ८ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १८६ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ९१९८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १७ ) : राजगुरूनगर – ३, चाकण –०, आळंदी – १४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८) :
# ४ रुग्ण आढळलेली गावे :-  कडाचीवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे, नाणेकरवाडी, सातकरस्थळ, केळगांव.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – २५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ९१९८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १९९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – १८६
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – १४
# आज झालेले मृत्यू – ३. वडगाव घेनंद येथे ६५ वर्षीय, मरकळ येथे ३६ वर्षीय असे २ पुरुष तर वराळे येथे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!