महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २१ ऑक्टोबर २०२० ) : आज खेड तालुक्यात आढळले ६२ नवीन रुग्ण, आखरवाडी, चाकण, मेदनकरवाडी व खराबवाडी येथील चार रुग्णांचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत ३०, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची वाढ, राजगुरूनगर व चाकणमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ८५२६,
८०४३ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : ( दि.२१ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ६२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज राजगुरूनगर व चाकण हॉट स्पॉटवर असून आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल चाकण शहरात ११ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ३०, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २९१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८५२६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३० ) : राजगुरूनगर – १४, चाकण – ११, आळंदी – ५,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३२) :
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे.
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी, बुट्टेवाडी, होलेवाडी.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी, चास.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, कुरुळी, वाकी बु., सातकरस्थळ, सोळू, वाडा, आखरवाडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या : ६२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या : ८५२६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या : १९२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या : २९१
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या : ३३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १४, चाकण – ११
# आज झालेले मृत्यू : आखरवाडी व चाकण येथील ७० व ६० वर्षीय महिला, तर मेदनकरवाडी व खराबवाडी येथील ४९ व ५८ वर्षीय दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे.