महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. १६ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात ४७ नवीन रुग्ण आढळले
नगरपरिषद हद्दीत २७, तर ग्रामीण भागात २० रुग्णांची वाढ, चाकण मध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ८१४४,
७५६५ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.१६ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७६५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात २७, तर ग्रामीण भागात २० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८१४४ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २७ ) : राजगुरूनगर – ११, चाकण – १४, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २०) :
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी, नाणेकरवाडी,
सावरदरी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- बिरदवडी, खालुंब्रे, मेदनकरवाडी, निघोजे, येलवाडी, कोरेगांव बु., काळेचीवाडी,
राक्षेवाडी, चास, मोहकल, वरुडे.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ४७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८१४४
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३०४
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १४
# आज झालेले मृत्यू – चाकण येथील एक ७० वर्षीय महिला