महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. १२ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात आढळले ४२ नवीन रुग्ण, दोन जणांचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत १५, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ,
चाकण मध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ७९८३,
७३७५ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१२ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ४२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहरात सर्वाधिक ११ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७३७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कडुस व आळंदी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नगरपरिषद क्षेत्रात १५, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७९८३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १५ ) : राजगुरूनगर –४, चाकण – ११, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २७) :
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- कडाचीवाडी, खराबवाडी, महाळुंगे, पाईट, आखारवाडी, चास, दावडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- खालुंब्रे, नाणेकरवाडी, वराळे, वाकी खु., येलवाडी, पापळवाडी, वाकी बु., बहुल, कडूस.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ४२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७९८३
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३१
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ११
# आज झालेले मृत्यू – कडूस येथील ७५ वर्षीय १ पुरुष व आळंदी येथील ५४ वर्षीय १ पुरुष.

