महाबुलेटीन कोरोना अपडेट ( दि. ११ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुका अपडेट : आज खेड तालुक्यात नवीन ५४ रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू
नगरपरिषद हद्दीत १६, तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ, राजगुरूनगरमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ७९४१,
७३२४ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.११ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज
राजगुरूनगर शहरात सर्वाधिक ७ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७३२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात १६, तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४४२ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७९४१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – ७, चाकण – ५, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३८) :
# ८ रुग्ण आढळलेली गावे :- कडाचीवाडी.
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी, महाळुंगे, निघोजे.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी, कुरकुंडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कडूस, आंभू, चिंबळी, गडद, खालुंब्रे, येलवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी, भोसे, गोलेगाव, काळूस, रासे, वाडा.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७९४१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४४२
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ९०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – ७
# आज झालेले मृत्यू – राजगुरूनगर (राक्षेवाडी) येथील ६६ वर्षीय १ पुरुष रुग्णाचा बळी (दि. ८ ऑक्टोबर २०२०)