Sunday, August 31, 2025
Latest:
निवडणूकपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज…लॉकडाऊन नंतर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला झाली सुरुवात…लागा निवडणुकीच्या तयारीला…

…अखेर ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग व आरक्षण कार्यक्रम जाहीर

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीचे संकट कमी होत चालले असून प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकरच होणार असून राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी आज दि. २० ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्रातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज ( प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक ) दि. १७ मार्च २०२० रोजी असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत निवडणूक आयोगाने स्थगित केल्या होत्या. त्यांच्या आदेशान्वये उक्त कार्यक्रम प्रभाग रचना अंतिम करण्याचा टप्पा स्थगित करण्यात आला.

आता, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात येत असून सदर बाब विचारात घेता, प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्यासाठी पुढीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

■ प्रभाग रचना अंतिम करणे ( परिच्छेद ५.३ )
————————
● उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे : मंगळवार, दि. २७/१०/२०२०
● जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला ( नमुना ‘अ’ मध्ये ) व्यापक प्रसिद्धी देणे : सोमवार, दि. २/११/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!